breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश झाला आहे. त्यांनी आज (रविवारी) राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी, मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बाळा भेगडे यांना शनिवारी (दि. 15) दूरध्वनी करून त्यांना ही गुड न्यूज दिली होती. बाळा भेगडे सलग दुस-यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पुणे जिल्हा भाजपचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळला मंत्रिपद मिळावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यांसाठी का होईना, मावळला मंत्रिपद मिळणार असल्याने मावळातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना 1988 च्या सुमारास मदन बाफना यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर प्रथमच मावळला मंत्रिपद मिळत आहे. तळेगाव दाभाडे शहरात प्रथमच मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button