breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिवसाआड पाणी पुरवठ्यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वराती मागून घोडे

कार्यकर्त्यांची थेट अजितदादाकडे तक्रार, पाणी प्रश्नावर शहर पदाधिकारी झोपलेले

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरात दहा दिवसापासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यास सत्ताधारी भाजपसह प्रशासनाचा स्पष्ट नकार आहे. त्यावरुन महापालिकेत विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पत्रक काढण्यापलिकडे काहीच झाले नव्हते. मात्र, जनतेच्या प्रश्नावर काॅंग्रेसने मोर्चा काढला. तर मनसे माठ फोडून सत्ताधारी भाजप व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, एका कार्यकर्त्यांने अजितदादाकडे पाणी प्रश्नावर तक्रार केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून आज (बुधवार) घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावरुन राष्ट्रवादीचे वराती मागून घोडे निघाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभार आणि टँकर लॉबीसाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना वेठीस धरले आहे. प्रशासनाला राजकीय, सामाजिक संस्था-पदाधिका-यांनी निवेदने देवूनही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळेच काॅंग्रेस-मनसेने आंदोलन केले. त्यानंतर राष्ट्रवादीला उशिरा जाग आली आहे.

शहरात अनधिकृत नळ कनेक्शन सुरु आहेत. पाणी चोरी व गळती मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याकडे प्रशासन सोईस्कररित्या दुर्लक्ष करत आहेत. या झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यास आज (बुधवार) मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने “घंटानाद आंदोलन” करण्यात आले.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, मंगलाताई कदम, युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, प्रविण भालेकर, पंकज भालेकर, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे, संतोष कोकणे, मयुर कलाटे,राजू बनसोडे, रोहित (आप्पा) काटे, संजय वाबळे, नगसरेविका अपर्णा डोके, समुनताई पवळे,  अनुराधा गोफणे, पौर्णिमा सोनवणे, संगिता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर, उषा काळे, स्वाती (माई) काटे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष विजय लोखंडे, संगीता कोकणे, निलेश पांढारकर, उत्तम आल्हाट, विशाल काळभोर, शाम जगताप, तुकाराम बजबळकर, जहीर खान, अमोल भोईटे, संजय औसरमल, प्रतिक इंगळे, प्रविण गव्हाणे, यतीन पारेख, संग्राम चव्हाण, पोपट पडवळ, मेघा पवार, सविता खराडे, शिला भोंडवे, विश्रांती पाडाळे, दिपाली देशमुख, किरण देशमुख, बाळासाहेब पिल्लेवार, यशवंत शिंदे, सतीश क्षीरसागर, गोरोबा गुजर, रामेश्वर लाहोटी आदी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button