breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी म्हणून अनेक परंपरातही खंडीत झाल्या. त्याचाच परिणाम म्हणून सध्या कोरोना परिस्थिती काहीशी सावरली आहे. मात्र तरीही हे संकट पूर्णपणे टळलेले नाही. परिणामी अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच 15 फेब्रुवारी 2021ला असणारी गणेश जयंती आणि तेव्हापासून सुरु होणाऱ्या माघ गणेशोत्सवासाठी राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

माघी गणेशोत्सव 2021च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे…
मंडप उभारणीसाठी पालिकेची अथवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावे, आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नये.

मंडपात एकावेळी १० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच एकावेळी फक्त १५ भाविकांना दर्शनासाठी प्रवेश द्यावा.

गणपती मंडपात निर्जंतुकीकरणाची आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी.

मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरता ४ फूट आणि घरगुती गणपती मूर्तीची २ फूटांच्या मर्यादेत असावी.

या वर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/ संगमरवर मूर्तींचे पूजन करावे.

मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.

माघी सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्य्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरं आयोजित करावी. तसेच श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क इत्यादीद्वारे उपलब्ध करावी.

मूर्ती विसर्जनाच्या वेळी जास्तीत जास्त ५ कार्यकर्ते असावेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button