breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मी फेट्याच्या बदल्यात पैसे घेतो’, पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

सोलापूर |महाईन्यूज|

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज पहिल्यांदा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे आले होते. यावेळी त्यांनी मी आल्यानंतर लगेच हार-तुरे, फेटे आणि फटाके ठीक आहे. या पुढे मला भेटायला काहीच आणू नका. मी कधीच फेटा बांधत नाही. फेटाच्या बदल्यात पैसे घेतो.

आंबेगाव मतदार संघातील लोकांकडून मी फेट्याच्या बदल्यात पैसे घेतो. या पैशाची लगेच त्यांना पावती देतो. फेट्यातून मिळणारी रक्कम सरकारी रुग्णालयातील रुग्णांसाठी खर्च करतो. फेट्यातून आम्हाला वर्षाला आठ ते दहा लाख रुपये मिळतात, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

सोलापूरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर वळसे-पाटील यांचे आज सोलापुरात प्रथमच आगमन झाले. शहर व जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

लोक प्रेमापोटी फेटे बांधतात आणि बांधलेल्या फेट्यांचे आपण काय करतो? हे सर्वांनाच माहिती आहे. एक फेटा किमान शंभर रुपयांना मिळतो. या पुढे मला भेटायला येताना काहीच आणू नका अन्यथा फेट्याचे पैसे रोख स्वरूपात द्या अशी सूचनाच पालकमंत्री वळसे-पाटील यांनी या मेळाव्यातून केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button