breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘माथेरानची राणी’ शुक्रवारपासून बंद

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज मिनि ट्रेन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ७ जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

माथेरान ते अमन लॉजपर्यंत असणाऱ्या शटल सेवा मात्र सुरू राहतील. त्यामुळे या सेवेचा प्रवाशांना आनंद लुटता येईल. मिनी ट्रेनची नेरळपासून सुरू होणारी सेवा ही डोंगरदऱ्यातून अमन लॉजपर्यंत जाताना दोन तासांचा प्रवास करते. यात वळणदार मार्ग असून त्यामुळे कोणताही धोका न पत्करण्यासाठी मिनी ट्रेन बंद ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button