Uncategorizedमहाराष्ट्र

मात्र त्यात चूक झाली तर…; रोहित पवारांनी व्यक्त केली नविन कोरोनावरील आपली भावना

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळून आला आहे याबाबत एक लेख लिहिला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळून आल्यानंतर संपूर्ण जग चिंतेत आहे. अशात कोरोनाच्या नव्या अवताराची लागण झालेल्या एक रुग्ण आशिया खंडात आढळून आला आहे. कोरोना विषाणूची नवीन प्रजाती आढळून आल्यानंतर ब्रिटन येथून आलेले तब्बल 20 जण कोरोना संक्रमित असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारत सरकारने युकेहून येणाऱ्या लोकांसाठी कठोर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये विमानतळावर प्रत्येकाची RT-PCR चाचणी करणे अनिवार्य असेल.

रोहित पवार यांच्या लेखाचा काही अंश – 

कोविड-१९ च्या संकटाला संपूर्ण जग सामोरं जात असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाचा (VUI-2020 12/01) हा नवीन स्ट्रेन सापडलाय. हा नवा स्ट्रेन OUT OF CONTROL म्हणजेच अत्यंत झपाट्याने पसरणारा असून सध्याच्या कोरोना व्हायरसपेक्षा ७०% अधिक वेगाने पसरत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय.

यावर आपल्या सरकारनेही त्वरित आंतरराष्ट्रीय विशेषतः ब्रिटनमधून येणाऱ्या फ्लाईट ३१ डिसेंबर पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये तयार झालाय की ब्रिटनबाहेर दक्षिण आफ्रिकेमध्ये हे अद्याप माहित नाही. याबाबत तज्ज्ञांमध्ये मत-मतांतरे आहेत. पण हा स्ट्रेन ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरत असल्याचं गेल्या आठवड्यापासून लक्षात आलं. त्यामुळं फक्त ब्रिटन मधून येणाऱ्या फ्लाईट बंद करून चालणार नाही तर इतर देशांच्या फ्लाईटबाबतही वेळीच योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. तसंच गेल्या आठवड्याभरात ब्रिटन किंवा इतर युरोपीय देशातून भारतात प्रवासी आले असतील तर त्यांच्याबाबतही काळजी घ्यावी लागणार आहे. याबाबत तज्ज्ञांकडून संभाव्य धोक्याची जाणीव करून देण्यात आली आहेच. त्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही.

मला विश्वास आहे, केंद्र सरकार आणि देशातील सर्व राज्य सरकारे हे नागरिकांच्या सहकार्याने या नवीन स्ट्रेनला आपल्या देशात शिरकाव करू देणार नाहीत. मात्र त्यात चूक झाली तर तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला त्याचा जबर भुर्दंड बसल्याशिवाय राहणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button