breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भाजपा म्हणजे म्हणजे ना’ताळ’ ना’मेळ’! व्यंगचित्रातून राष्ट्रवादीचे शरसंधान

भाजपा हा पक्ष म्हणजे ना ताळ ना मेळ फक्त जुमल्यांचा खेळ अशी परिस्थिती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरच्या एका व्यंगचित्राच्या माध्यमातून ही टीका करण्यात आली आहे. भाजपा म्हणजे ना ताळ ना मेळ फक्त जुमल्यांचा खेळ असा मथळा देऊन हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे.

या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवण्यात आले आहेत. आम्ही जलयुक्त शिवाराची कामे केली असे ते म्हणत आहेत. तर त्यांच्याच मागे नितीन गडकरी दाखवण्यात आले आहेत. हिजड्यांना मुलं होतील पण जल संधारणाची कामं पूर्ण होणार नाहीत हे त्यांचे वक्तव्य दाखवण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह चर्चा करत आहेत. ज्यामध्ये बहुदा गडकरींच्या तोंडात बोळा कोंबावा लागेल असे मोदी अमित शाह यांना म्हणताना दिसत आहेत. याच व्यंगचित्राच्या खाली एक गरीब माणूस दाखवण्यात आला आहे आणि त्याच्यापुढे विकास हा भकास असे लिहिण्यात आले आहे.

NCP

@NCPspeaks

आश्वासनांची गाजरे दाखवणाऱ्या या सरकारला आपल्याच नेत्यांच्या वक्तव्यांचा ताळमेळ राहिलेला नाही. नेमकी भूमिका मांडणे या सरकारला कधी जमलेच नाही. आता तर आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळवीरांच्या तोंडावर ताबा आणण्याची कसरत सरकारला करावी लागत आहे.

37 people are talking about this

भाजपाच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. मग ती हनुमानाबाबत असो किंवा जलसंधारणाबाबत. नेत्यांच्या जीभेवरचा ताबा सातत्याने सुटताना दिसतो आहे. तोच संदर्भ घेऊन हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे. आता यावर भाजपा राष्ट्रवादीला कशाप्रकारे उत्तर देणार ते पाहणे रंजक ठरणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button