breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ…सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री; प्रतिसिलिंडर १५ रुपयांची दरवाढ

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. आजपासून (1 ऑक्टोबर) घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. देशातल्या मुख्य शहरातील विनाअनुदानित गॅस सिलिंडर 15 रुपयांनी महागला आहे. आज नवी दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी 605 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 630 रुपये द्यावे लागणार आहे. मुंबई, चेन्नईमध्ये 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरचे दर क्रमशः 574.50 आणि 620 रुपये झाले आहेत. तर 19 किलोग्राम सिलिंडरची दिल्लीतली किंमत 1085 रुपये झाली आहे. कोलकात्यात 1139.50 रुपये, मुंबई 1032.50 रुपये आणि चेन्नईमध्ये याच 19 किलोच्या सिलिंडरचे दर 1199 रुपये आहे. 

  • सप्टेंबरमध्येही वाढले गॅस सिलिंडरचे दर

सप्टेंबरमध्ये दिल्लीत 14.2 किलो विनाअनुदानित सिलिंडर 590 रुपये होता. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 616.50 रुपये होता. तर मुंबई आणि चेन्नईत 14.2 किलो विनाअनुदानित सिलिंडरचा दर क्रमशः 562 आणि 606.50 रुपये होता. तसेच 19 किलोग्रामच्या दिल्लीतल्या सिलिंडरची किंमत 1054.50 रुपये होती. कोलकात्यात गेल्या महिन्यात 1114.50 रुपये, मुंबईत 1008.50 रुपये आणि चेन्नईत 1174.50 रुपये दर होता. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button