breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

माढ्यातून रणजित नाईक-निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी, मोहिते पाटलांना डावलले

मुंबई – माढा लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये दाखल झालेले रणजितसिंह मोहिते-पाटलांना डावलण्यात आल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

माढ्यातून भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील, रोहन देशमुख यांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव जाहीर केले आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटलांचे वडील विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस या तालुक्यांसह पंढरपूर तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील उत्तर-पूर्व भागांचा समावेश आहे. या उत्तर-पूर्व भागांतच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मोठा जनाधार आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची आता चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button