breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खंडाळा बोगद्याजवळ विचित्र अपघातात युवकाचा मृत्यू

खंडारा  –  सातारा-पुणे रस्त्यावर खांबाटकी बोगदयाजवळ शनिवारी रात्री ११ च्या सुमारास माल ट्रक पलटी झाला. यामध्ये मालट्रकच्या डिझेलची टाकी फुटल्‍याने टाकीतील सर्व डिझेल रस्‍त्‍यावर आले. यामुळे अनेक गाड्‍या घसरून पडल्‍या, यामध्ये दुचाकी घसरून झालेल्‍या अपघातात, कोल्‍हापूरचा एकजण जागीच ठार झाला.

सातारा – पुणे रस्‍तयावरील खंबाटकी बोगद्‍याजवळ शनिवारी रात्री मालट्रकच्या डिझेलची टाकी फुटली. यावेळी टाकीतील सर्व डिझेल रस्‍त्‍यावर आल्‍याने रस्‍ता निसरडा बनला होता. त्‍यामुळे या रस्‍त्‍यावरून जाणार्‍या अनेक वाहनांना अपघात घडला. यामुळे अनेक वाहने घसरून एकमेकांना धडकली. या विचित्र अपघातात ९ वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये दुचाकी घसरून कोल्हापूर येथील संकेत राजेंद्र पवार (वय : १९) हा जागीच ठार झाला. महामार्गावर डिझेल, ऑईल, व द्राक्षांचा सडा पडल्याने हा अपघात झाल्‍याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान यावेळी सातार्‍याकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या पाच ते सहा किलोमिटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. खंडाळा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार, शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, महामार्ग सुरक्षा पथक , खंडाळा रेस्क्यू टीम  यांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यातील वाहने बाजूला केली. डिझेल ऑईलवर दोन डंपर माती टाकून रस्ता साफ केला. द्राक्षांमुळे सर्वत्र झालेल्या चिखल व ऑईलमुळे  वाहने घसरत होती. एशियन पेंटस कंपनीच्या अग्निशमन दलाने संपूर्ण रस्ता पाण्याने स्वच्छ केला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. रात्री अकरा ते पहाटे तीन पर्यंत या मार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू  होती. वाहतूक नियंत्रण व मदत कार्यात पारगांव – खंडाळा येथील युवराज ढमाळ , अजित यादव , अक्षय खोपडे व युवकांनी सहकार्य केले .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button