ताज्या घडामोडी

माढ्याचा लढा… मोहिते-पाटील फुंकणार तुतारी!

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला जबर धक्का देताना अकलूजच्या मोहिते-पाटील परिवाराने थेट बंड पुकारले. ‘आमचं ठरलंय, आम्ही तुतारी वाजवणार. धैर्यशील मोहिते-पाटील लोकसभा निवडणूक ‘तुतारी’ या चिन्हावर लढवणार असून, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहे,’ अशी माहिती सहकारमहर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी आज दिली. माढय़ाबरोबरच बारामती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांत भाजपचा दारुण पराभव करणार, असा इशारा त्यांनी दिला.

जयसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू आहेत. माढा, माळशिरस, अकलूज, पंढरपूर परिसरात मोहिते-पाटील परिवाराचे राजकीय वर्चस्व आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दुसऱयांदा माढा लोकसभेची उमेदवारी देण्यास मोहिते-पाटील परिवाराचा विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने बंडाची ठिणगी पडली. देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन यांनी गेल्या आठवडय़ात अकलूजमध्ये आले होते. मात्र, अकलूजमध्ये मोहिते-पाटील समर्थकांनी महाजनांना घेरावा घातला होता.

– माढा, बारामती, सोलापूर या लोकसभेच्या जागा तर माण, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा या विधानसभेच्या जागा महायुतीला गमवाव्या लागणार आहेत, असा इशाराच जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिला. दरम्यान, आमदार रणजितसिंह यांच्याशिवाय आम्ही सर्व परिवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत. गेल्या आठ दिवसांत आमच्या परिवारातील सर्व सदस्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात विविध गावांमध्ये जाऊन लोकभावना जाणून घेतली. त्यानंतर आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘शिवरत्न बंगल्यावर गाठीभेटी आणि निर्णय
मोहिते-पाटील यांच्या शंकरनगर येथील शिवरत्न बंगल्यावर बुधवारी वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. सकाळी 11 च्या सुमारास भाजपाचे माढा लोकसभा निरीक्षक माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शिवरत्न बंगल्यावर भेट दिली. जयसिंह मोहिते-पाटील आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील शिवरत्न बंगल्यावर मोहिते-पाटील यांची भेट घेतली. यावेळी मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीबाबत पत्रकारांनी विचारले असता कोल्हे यांनी वेट अॅण्ड वॉच म्हणत आमच्या पक्षाची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.

​  

​माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला जबर धक्का देताना अकलूजच्या मोहिते-पाटील परिवाराने थेट बंड पुकारले. ‘आमचं ठरलंय, आम्ही तुतारी वाजवणार. धैर्यशील मोहिते-पाटील लोकसभा निवडणूक ‘तुतारी’ या चिन्हावर लढवणार असून, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहे,’ अशी माहिती सहकारमहर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी आज दिली. माढय़ाबरोबरच बारामती 

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला जबर धक्का देताना अकलूजच्या मोहिते-पाटील परिवाराने थेट बंड पुकारले. ‘आमचं ठरलंय, आम्ही तुतारी वाजवणार. धैर्यशील मोहिते-पाटील लोकसभा निवडणूक ‘तुतारी’ या चिन्हावर लढवणार असून, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहे,’ अशी माहिती सहकारमहर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी आज दिली. माढय़ाबरोबरच बारामती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांत भाजपचा दारुण पराभव करणार, असा इशारा त्यांनी दिला.

जयसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू आहेत. माढा, माळशिरस, अकलूज, पंढरपूर परिसरात मोहिते-पाटील परिवाराचे राजकीय वर्चस्व आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दुसऱयांदा माढा लोकसभेची उमेदवारी देण्यास मोहिते-पाटील परिवाराचा विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने बंडाची ठिणगी पडली. देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन यांनी गेल्या आठवडय़ात अकलूजमध्ये आले होते. मात्र, अकलूजमध्ये मोहिते-पाटील समर्थकांनी महाजनांना घेरावा घातला होता.

– माढा, बारामती, सोलापूर या लोकसभेच्या जागा तर माण, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा या विधानसभेच्या जागा महायुतीला गमवाव्या लागणार आहेत, असा इशाराच जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिला. दरम्यान, आमदार रणजितसिंह यांच्याशिवाय आम्ही सर्व परिवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत. गेल्या आठ दिवसांत आमच्या परिवारातील सर्व सदस्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात विविध गावांमध्ये जाऊन लोकभावना जाणून घेतली. त्यानंतर आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘शिवरत्न बंगल्यावर गाठीभेटी आणि निर्णय
मोहिते-पाटील यांच्या शंकरनगर येथील शिवरत्न बंगल्यावर बुधवारी वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. सकाळी 11 च्या सुमारास भाजपाचे माढा लोकसभा निरीक्षक माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शिवरत्न बंगल्यावर भेट दिली. जयसिंह मोहिते-पाटील आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील शिवरत्न बंगल्यावर मोहिते-पाटील यांची भेट घेतली. यावेळी मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीबाबत पत्रकारांनी विचारले असता कोल्हे यांनी वेट अॅण्ड वॉच म्हणत आमच्या पक्षाची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button