पिंपरी / चिंचवड

चाकण, पिंपरी, दिघीत तीन घरफोड्या : अडीच लाखांचा मुद्देमाल चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

चाकण, पिंपरी आणि दिघी येथे घरफोडीच्या तीन घटना घडल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी दोन लाख 41 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

चाकण येथील घटनेत अरविंद नामदेवराव पिसे (वय 39, रा. निघोजे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कामावर गेले असताना त्यांची पत्नी आणि मुले खालच्या खोलीला कुलूप लाऊन वरच्या मजल्यावरील खोलीत झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून एक लाख 43 हजारांचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली. तसेच फिर्यादी यांच्या शेजारी श्रीशैल के शेट्टी यांच्या घरातून नऊ हजारांची रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि आरसी बुक चोरले. एकूण एक लक्झ 52 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

पिंपरी येथील घटनेत सतीश रतन सौदागर (वय 34, रा. न-हे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची शेवाळे सेंटर पिंपरी येथे बीटमॅपर टेक्नोलॉजी ही कंपनी आहे. त्या कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी 74 हजारांचे साहित्य चोरून नेले आहे.

दिघी येथील घटनेत अशोक कुमार कन्हैयालाल पुरोहित (वय 29, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. मोहित राजू पाटोळे (वय 19, रा. वानवडी), साहिल मुन्नावर शेख (वय 19, भवानी पेठ, पुणे) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे भूमी गिफ्ट शॉपी हे दिघी मधील ममता चौकात दुकान आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 15 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button