TOP Newsताज्या घडामोडीपुणे

सामान्यांची दिवाळी गोड 

पुणे : सामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी यंदाही दी पूना मर्चंट्स चेंबरकडून रास्त भावात लाडू-चिवडा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे ३५ वे वर्ष आहे. येत्या सोमवारपासून (१७ ऑक्टोबर) लाडू-चिवडा उपक्रमास प्रारंभ होणार आहे.

लाडू-चिवडा उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रमकुमार या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. मार्केट यार्ड-गंगाधाम परिसरातील जयजिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजुश्री सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी लाडू-चिवड्याच्या प्रति किलोचा भाव दीडशे रुपेय आहे आहे. अर्धा किलोचा भाव ८० रुपये असल्याची माहिती दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले या वेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button