breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

“माझ्याकडे बसून रडण्यासाठी देखील वेळ नव्हता”, बहिणीच्या एसिड हल्ल्यानंतर कंगनाला सोसावे लागले चटके…

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत लवकरच ‘पंगा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारीने केले आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये कंगनाने आपल्या करियरमधील सर्वात वाईट काळाबद्दल सांगितलं. कंगनाला तिच्या करियरच्या सुरूवातीला वाईट सिनेमात वाईट भूमिका का स्वीकाराव्या लागल्या? याचं कारण सांगताील …

नुकताच दीपिका पदुकोणचा छपाक चित्रपट रिलीज झाला. यावर कंगनाची बहिण रंगोली चंडेलने सोशल मीडियावर ट्विटरवर चित्रपटाची प्रशंसा केली होती आणि शुभेच्छा दिल्या. दीपिका व कंगना या दोघींमध्ये काही खास मैत्री नाही.मात्र रंगोलीने असे केले कारण तिच्यावर देखील एसिड अटॅक झाला होता. रंगोलिनेही तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला , ती कॉलेजमध्ये असताना एका मुलाने तिला प्रपोझ केले होते आणि रंगोलीने त्याला नकार दिला होता. त्यानंतर तो मुलगा तिला त्रास देऊ लागला होता. त्यावेळी ती देहरादूनमध्ये इंजिनिअरिंग करत होती. त्यावेळी ती मैत्रींसोबत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती.

एक दिवस रंगोलीचं लग्न ठरलं. ही गोष्ट त्या मुलाला समजली तेव्हा तो खूप चिडला. तो रंगोलीला शोधत तिच्या पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या ठिकाणी आला. मैत्रिणींच्या सांगण्यावरून रंगोलीने दरवाजा उघडला तेव्हा त्याने तिच्यावर एसिड फेकले. ही गोष्ट आहे २००६ची. तेव्हा रंगोली २३ वर्षांची होती. या एटॅकमुळे तिचा चेहरा जळला. एका डोळ्यानं दिसणं बंद झालं. श्वासनलिका लहान झाली. महिनाभर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आणि ५०हून जास्त सर्जरी झाली. कंगनाचे पालक रंगोलीला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हते. ते तिला पाहून बेशुद्ध व्हायचे. अखेर कंगना रंगोलीला स्वतःसोबत मुंबईत घेऊन आली.

कंगनाने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी फक्त १९ वर्षांची होती. करियरच्या चांगल्या वळणावर होते. पण त्यावेळी अटॅक व सेक्सिस्ट क्रुरतेच्या विरोधातील आमचा लढा खूप काळ होता आणि कठीण होता. आर्थिकरित्यादेखील तेवढाच कठीण होता. कारण तेव्हा मीदेखील खचले होते. माझ्या आजूबाजूच्या मुलींदेखील या गोष्टीमुळे डिप्रेस व्हायच्या की त्याचे केस आज ठीक वाटत नाही आणि आवडतं जेवण मिळत नाही. माझा त्रास त्यांच्यापेक्षा जास्त मोठा होता. माझ्याकडे बसून रडण्यासाठी देखील वेळ नव्हता. मी बेकार चित्रपटांमध्ये काम केलं. ज्या भूमिका स्वीकारल्या ज्या मी डिजर्व्ह करत नव्हते. लोकांच्या चित्रपटात गेस्ट अपियरेंन्स केला. कारण माझ्या बहिणीचे उपचार भारतातील बेस्ट डॉक्टरांनी करायला पाहिजे होते. रंगोलीच्या जवळपास ५४ सर्जरी झाल्या.

मात्र त्या दिवसांत दिग्दर्शक अनुराग बसूने खूप मदत केल्याचं कंगनाने सांगितलं .अनुराग बसूने त्यांच्या गँगस्टर चित्रपटासाठी कंगनाची निवड केली. त्या चित्रपटात कंगनाऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घ्यावे अशी बऱ्याच लोकांची इच्छा होती.निर्माते महेश भट यांना या सिनेमात चित्रांगदा सेनला घ्यायचे होते. कारण कंगना पाच वर्षाच्या मुलाच्या आईसारखी दिसत नव्हती. मात्र अनुराग कंगनासाठी लढला व तिला हा रोल दिला. त्यामुळे कंगना त्यांना तिचे गॉडफादर मानते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button