breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणात 496 आशा, अंगणवाडी सेविकांचा समावेश

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 182 आशा स्वंयसेविका आणि 314 अंगणवाडी सेविका अशा एकूण 496 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रतिदिन 450 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी 55 लाख 80 हजार रुपये खर्च होणार आहे.

शहरामध्ये करोना संसर्गाचा आलेख वाढतच आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी घरोघरी भेटी देऊन आरोग्य तपासणी व जनजागृती केली जात आहे. संशयित करोना रुग्ण शोधणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार असलेल्या व्यक्तींना शोधण्याचे काम मोहिमेत केले जाते. याशिवाय बालकांचे लसीकरण करणे. गरोदर मातांवर वेळीच उपचार या बाबींचाही समावेश आहे. ही मोहीम पहिल्या फेरीत 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर आणि दुसऱ्या फेरीमध्ये 14 ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत होणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पहिल्या फेरीमधील 15 दिवसांमध्ये 54 हजार 575 घरांना भेटी देणे आवश्‍यक आहे. दैनंदिन एका पथकाने 35 घरभेटी याप्रमाणे एकूण 1 हजार 559 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी, वॉर्डनिहाय एक स्थानिक नागरिक त्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला अशा तीन व्यक्तींचा समावेश असणार आहे. यामध्ये आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी 182 आशा स्वंयसेविका आणि 314 अंगणवाडी सेविकांना सामावून घेण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button