breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड गावठाणात विकास कामे प्रलंबित; नागरिकांना होतोय मनस्ताप

ठेकेदारांकडून खोदाई करताना प्रचंड नुकसान, मोरेश्वर शेडगे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्तांची घेतली भेट

पिंपरी |महाईन्यूज|

चिंचवड गावठाण प्रभाग क्रमांक 18 मधील हेरिटेज प्रकल्पांतर्गत टप्पा दोनची कामे अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यात ठेकेदारांकडून खोदाई करताना नागरिकांचे प्रचंड नूकसान होत आहे. तसेच चिखल, राडारोड्यामुळे रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांसमोर संबंधित अधिका-यासह ठेकेदाराची झाडाझडती घेत धारेवर धरले.

याबाबत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांची भेट घेतली. चिंचवड गावठाण परिसरात सुरू असलेल्या कामाच्या सद्यस्थितीचे फोटो दाखवून परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष मिथुन बोरगाव, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळीग्राम, युवा मोर्चाचे सरचिटणीस अजित कुलथे, अनिकेत पायगुडे, केदार बावळे, अतुल पडवळ ,सागर गरुड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ठेकेदाराकडून खोदाई करताना नागरिकांच्या भूमिगत विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या, जलनिस्सारण वाहिन्या यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या वाहिन्या दुरुस्त न करता पुढील कामे ठेकेदार करीत आहेत. तसेच जागोजागी खड्डे पडल्याने मातीचे ढिगारे, राडारोडा पडून राहिल्याने नागरिकांना त्रास होवू लागला आहे.

नगरसेवक शेडगे म्हणाले की, चिंचवड गावठाण या ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकासकामामुळे येथील नागरिकांचे वैयक्तिक फार मोठे नुकसान झाले आहे. तरीही नागरिक प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. मात्र सदर कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. सदर कामासंदर्भात चालढकलपणा न करता तातडीने गावठाणातील सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे व नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्याची आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button