माजी खासदार निलेश राणेच्या पुतळ्याचे वाकडमध्ये दहन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने वाकडमध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त केला. तसेच राणेंनी शिवसैनिकांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना पिपरी-चिंचवड शहरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मुकेश कस्पटे यांनी दिला.
या आंदोलनात विभागप्रमुख मुकेश कस्पटे, रोहित अत्रे, समीर इनामदार, सोनू कस्पटे, गोरख येवले, पवन पवार, किरण देहाडे, समीर कस्पटे, विशाल पवळे आदी उपस्थित होते. नीलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आनंद दिघे यांच्या मृत्यूला बाळासाहेब जबाबदार असल्याचा आरोप केला होता. राणे यांच्या या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यावेळी नीलेश राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी प्रतिमेचे दहन केले. यावेळी नीलेश राणे यांनी शिवसैनिकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील करण्यात आली. अन्यथा, पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिक राणे यांना शहरात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा कस्पटे यांनी दिला.