breaking-newsताज्या घडामोडीपुणे

फेरफार अदालतीमध्ये नागरिकांनी उपस्थित राहून प्रलंबित नोंदी करून घ्याव्यात – जिल्हाधिकारी

पुणे – आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड 19 बाबतच्या नियमांचे पालन करुन पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर सप्टेंबर 2021 मधील फेरफार अदालत 8 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केली जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

8 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये ज्या कोणाच्या फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालय उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देण्यात येवून आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 7 सप्टेंबर 2020 च्या शासननिर्णयान्वये लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येवून जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करणेच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी झालेने मागील महिन्यात 25 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या अदालतीमध्ये 4 हजार 168 इतक्या नोंदी निर्गत झालेल्या आहेत. आता या महिन्यात दुसऱ्या बुधवारी 8 सप्टेंबर 2021 रोजी फेरफार अदालत आयोजित करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिलेले आहेत.

पुणे जिल्ह्यात 6 सप्टेंबर 2021 अखेर मुदत पुर्ण झालेल्या 13 हजार 735 नोंदी प्रलंबित असून या नोंदी मध्ये प्रामुख्याने साध्या/वारस/तक्रार व मुदत पुर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करणेबाबत या कार्यालयाकडुन यापुर्वीही संबंधितांना सूचना देणेत आलेल्या आहेत. या अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालती मध्ये प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापुर्वीच नियुक्त केले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार देखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सुचना यापुर्वीच देण्यात आलेल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button