ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘चिंचवड’मधील मतदान नोंदणीसाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी : जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात जास्तीत -जास्त मतदान नोंदणी व्हावी यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबवत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि.११) कर संकलन व कर आकारणी विभागाच्या कार्यालयात प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीला भाऊसाहेब दिनकर कुटे, राकेश दिलीप काळे, रवींद्र गजानन यंगड, सागर सुरेश भोर, धनाजी तांबे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), मिलिंद सुरेश कंक, संतोष गुलाब कलाटे (भारतीय जनता पार्टी), रमेश नरवडे, अशोक वाळके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपस्थित होते. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीबाबात माहिती देताना नोंदणी अधिकारी देशमुख म्हणाले ”निवडणूक आयोगाच्या फाॅर्म क्रमांक 9, 10,11, 11 अ आणि 11 ब याविषयी माहिती देण्यात आली. मतदार नोंदणी कार्यालयामार्फत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ब, ड, ग आणि ह या चार क्षेत्रीय कार्यालय व चिंचवड विधानसभा मतदार नोंदणी कार्यालय येथे प्रत्येक शुक्रवारी फाॅर्म क्रमांक 9, 10,11, 11 अ आणि 11 ब प्रसिद्ध करण्यात येत असतात. हे सर्व फाॅर्म त्या मतदार नवीन नोंदणी, नावे वगळणे, नावातील दुरुस्ती, पत्ता बदलण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारच्या फाॅर्म हे निवडणूक कार्यालयाला प्राप्त होत असतात, त्या फाॅर्मचा सारांश हा वरील फाॅर्ममध्ये असतो. या पाच ठिकाणची माहिती होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्व फाॅर्मची सखोल माहिती देऊन त्यांची मतेही जाणून घेण्यात आली. या फाॅर्ममधील त्रुटी अथवा यामधील आवश्यक बदल केल्यास मतदार शुध्दीकरणासाठी जास्तीत-जास्त उपयोग होईल, यासह आदी सुचना राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. या सूचनांबाबत निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात येईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

चिंचवडमध्ये 510 मतदान केंद्र
चिंचवड विधानसभा मतदारसंघात आजमितीस 510 मतदान केंद्र आहेत. परंतु मतदारांचा वाढता ओघ लक्षात घेता आणि आयोगाने घालून दिलेले निकष विचारात घेता मतदान केंद्रात होणाऱ्या बदलाविषयी व केंद्राच्या संभाव्य वाढी संदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना इत्यंभूत माहिती देण्यात आली. तसेच मतदान केंद्र सुसूत्रीकरणाचा सक्षम अधिकारी व आयोगाकडून मान्य झाल्यानंतर सर्व संबंधितांना माहिती देण्यात येईल.

मतदान यादीचे शुध्दीकरण होणे हे मतदान यंत्रणा व निवडणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या राजकीय पक्ष व अपक्ष यांच्यासाठी गरजेचे आहे. तसेच परस्पर सहकार्याने काम करणे देखील तितकेच गरजेचे आहे. यासाठी आवश्यक त्या सुचना लेखी स्वरूपात कराव्यात, असे आवाहनही नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button