breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मागील वर्षी कर्जमाफीनंतर मराठवाडा, विदर्भात ३१२ शेतकरी आत्महत्या

मुंबई | कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याने त्याला कर्जमुक्त करण्याची योजना प्रत्येक सरकार गेली अनेक वर्षे आणत आहे. कर्जमुक्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र थांबलेल्या नाहीत. सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत विदर्भ-मराठवाड्यातील ३१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आता राज्य सरकारनेच जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारनेही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना लागू केली होती. त्यानंतरही या आत्महत्या झाल्याने कर्जमाफी नेमकी कोणाला मिळते, असा प्रश्न आता पुन्हा एकदा विचारला जाऊ लागला आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लेखी उत्तरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कबुली दिली. आशिष शेलार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्य सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती विचारताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे म्हटले आहे.

यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ मध्ये ३१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मान्य केले. यापैकी १३४ शेतकऱ्यांची आत्महत्या प्रकरणे सरकारी मदतीस पात्र ठरवण्यात आली असून ५४ प्रकरणे नियमानुसार अपात्र ठरवण्यात आली आहेत, तर १२४ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button