breaking-newsपिंपरी / चिंचवड
महिला दिनानिमित्त मणिकर्णिका फाऊंडेशनची बाईक ‘रॅली’
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त मणिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने बाईक रॅली घेण्यात आली. रॅलीमध्ये २०० महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन मुक्ता गोसावी, शिल्पा नगरकर, अदिती धुळे, अनुष्का वैंशपायन, अंजली पांडे, प्रियांका देशमुख, शर्मिला मेहेर, अभा जोशी, तृप्ती जोशी, वैदेही चौधरी यांनी केले होते.
यासंदर्भात प्रभागातील सर्व महिला भगिनींना आग्रहाचे निमंत्रण आणि या रॅली मध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया उत्तम केंदळे आणि नगरसेविका कमल बापू घोलप यांनी केले होते.