breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत बांधकामप्रकरणी 13 जणांना महापालिकेचा फौजदारी ‘दणका’

पिंपरी / महाईन्यूज

लोकडाऊननंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अत्यंत सतर्क झाले आहे. काही दिवसांत बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाच्या नोटिसांना केराची टोपली दाखविणा-या 13 जणांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये मंगळवारी (दि. 1) पिंपरी पोलीस ठाण्यात सात, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुनील शिंदे (रा. खराळवाडी, पिंपरी), वेदांतम राघवन (रा. खराळवाडी, पिंपरी), सुनील भिला गलांडे (रा. नेहरूनगर, पिंपरी), महेश गजानन पाटील (रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी), प्रकाश गणपत कालापुरे (रा. खराळवाडी, पिंपरी), अंबादास उत्तरेश्वर गाढवे (रा. नेहरुनगर, पिंपरी), अमोल मनोहर चव्हाण (रा. अजमेरा, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात वेगवेगळे सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अर्चना सतीश पाटील (रा. काळेवाडी, वाकड), राहुल अनंता कुंभारकर (रा. काळेवाडी, वाकड), शोभा मारुती नाईक (रा. काळेवाडी, वाकड) या तिघांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, विष्णू शंकर मरुडकर, विजय केशवराव महामुणकर, अविनाश रघुनाथ करणे (तिघे रा. आदर्शनगर, किवळे) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनधिकृत बांधकाम केल्यानंतर महापालिकेकडून संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेच्या नोटिसांच्या आदेशानुसार संबंधितांनी अनधिकृत बांधकाम काढले नाही. याबाबत प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button