breaking-newsक्रिडा

महिला क्रिकेट स्पर्धा : विनर अकादमी, रिग्रीन, पीडीसीए संघांची आगेकूच

  • आबेदा इनामदार अखिल भारतीय महिला क्रिकेट स्पर्धा : फाल्कन्स, वेरॉक, सोलापूर संघ पराभूत 

पुणे – विनर अकादमी, रिग्रीन व पीडीसीए या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम कॅम्पस मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.

एकतर्फी झालेल्या लढतीत विनर अकादमी संघाने पुणे फाल्कन्स संघाला तब्बल 132 धावांनी पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच केली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 15 षटकांत 2 बाद 177 धावा केल्या. सई पुरंदरेने धडाकेबाज फलंदाजी करताना 48 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 92 धावांची खेळी केली. तिला नेहा बडविकने 7 चौकारांसह 46 धावा करताना सुरेख साथ दिली. वैष्णवी काळे व वर्षा चौधरीच्या भेदक गोलंदाजीने फाल्कन्स संघाचा डाव निर्धारित 15 षटकांत 9 बाद 45 धावांवर संपुष्टात आला. वैष्णवी काळेने 3 तर वर्षा चौधरीने 2 गडी बाद करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फाल्कन्स संघाकडून पूनम खेमणार (9), पूजा जैनने नाबाद 8 धावांची खेळी केली.

रिग्रीन संघाने वेरॉक वेंगसरकर अकादमी संघाला 53 धावांनी पराभूत केले. रिग्रीन पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 15 षटकांत 3 बाद 115 धावसंख्या उभारली. मुक्‍ता मगरे 44, तेजल हसबनीसने 39, तर वैष्णवी रवालीयाने 14 धावा करीत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. प्राजक्ता डुंबरेने 2 गडी बाद केले. 116 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेरॉक वेंगसरकर अकादमी संघाला निर्धारित 15 षटकांत 6 बाद 62 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रद्धा पोखरकरने 20 धावांची खेळी केली. रिग्रीन संघाकडून सायली अभ्यंकर 2 गडी बाद केले. मुक्‍ता मगरे सामनावीर ठरली.

पीडीसीए संघाने सोलापूर संघाला 9 गडी राखून पराभूत केले. सोलापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 15 षटकांत 8 बाद 57 धावांपर्यंत मजल मारली. सोलापूर संघाकडून अंबिका वाटाडेने 18, तर समृद्धी म्हात्रेने 11 धावांची खेळी केली. पीडीसीए संघाकडून रोहिणी मानेने 3 गडी बाद केले. पीडीसीए संघाने आदिती काळे 29 व संजाना शिंदे 14 यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 58 धावांचे आव्हान 1 गड्याच्या मोबदल्यात 10.2 षटकांत पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक : 
विनर अकादमी – 15 षटकांत 2 बाद 177. (सई पुरंदरे 92, नेहा बडविक 46, सारिका कोळी 15, श्वेता जाधव 14, सारिका डाकरे 16-1, सविता ठाकर 23-1) वि. वि. पुणे फाल्कन्स – 15 षटकांत 9 बाद 45 (पूनम खेमणार 9, पूजा जैन 8, वैष्णवी काळे 4-3, वर्षा चौधरी 5-2, सारिका कोळी 3-1, उत्कर्षा पवार 4-1, आफरीन खान 8-1, अपूर्वा भारद्वाज 11-1), रिग्रीन – 15 षटकांत 3 बाद 115 (मुक्‍ता मगरे 44, तेजल हसबनीस 39 (4 चौकार) प्राजक्ता डुंबरे 25-2, आरती बेनिवाल 20-1) वि. वि. वेरॉक वेंगसरकर अकादमी- 15 षटकांत 6 बाद 62 (श्रद्धा पोखरकर 20, ऋतुजा गिलबिले 11, स्वांजली मुळे नाबाद 11, सायली अभ्यंकर 8-2, ईशा पाठारे 9-1, पालवी विद्वांस 14-1), सोलापूर – 15 षटकांत 8 बाद 57 (अंबिका वाटाडे 18, समृद्धी म्हात्रे 11, रोहिणी माने 8-3, प्रियांका कुंभार 17-1) पराभूत वि पीडीसीए – 10.2 षटकांत 1 बाद 58 (अदिती काळे 29, संजना शिंदे 14, मानसी बोर्डे 12-1).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button