breaking-newsक्रिडा

महिलांच्या आयपीएल लढतीसाठी संघ जाहीर, मंधाना व हरमनप्रीत यांच्याकडे नेतृत्व

नवी दिल्ली – बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या प्ले-ऑफ सामन्याच्या आधी मुंबईच्या वानखेडे मैदानावर 22 मे रोजी महिला खेळाडूंचा एक प्रदर्शनीय टी-20 सामना आयोजित केला आहे. या सामन्यासाठी संघांची घोषणा काल करण्यात आली. भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधाना आणि धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौर यांच्याकडे या संघांचे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. यामध्ये मंधानाच्या संघाचे नाव असेल आयपीएल ट्रेलब्लेझर्स तर हरमनप्रीतच्या संघाचे नाव असेल आयपीएल सुपरनोव्हा.

या सामन्यात एकुन 26 खेळाडू सहभागी होणार आहेत ज्यात 10 महिला खेळाडूया ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्युझिलंड या संघातील असणार आहेत. सामन्यात प्रत्येक संघात 13 खेळाडू असणार आहेत. सामन्यासाठी संघांची घोषणाही आज बीसीसीआय मार्फत करण्यात आली आहे. ज्यात आयपीएल ट्रेलब्लेझर्स संघाकडून झूलन गोस्वामी, जेमिमा रॉड्रिग्ज, ऍलिसा हीली, बेथ मूनी सारख्या आघाडीच्या खेळाडू सहभागी होणार आहेत तर आयपीएल सुपरनोव्हाकडून मिताली राज, एलिस पेरी, मेग लॅनिंग, पूजा वस्त्रकार यांसारख्या तडाखेबाज खेळाडूंचा भरणा आहे.

प्रतिस्पर्धी संघ – 
आयपीएल ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधाना (कर्णधार), ऍलिसा हीली (यष्टीरक्षक), सूझी बेट्‌स, दूप्ती शर्मा, बेथ मूनी, जेमिमा रॉड्रिग्ज, डॅनिएली हेझल, शिखा पांडे, ली ताहुहु, झूलन गोस्वामी, एकता बिश्‍त, पूनम यादव, दयालन हेमलता.

आयपीएल सुपरनोव्हा – हरमनप्रीत कौर (कर्णधार), डॅनिएली वॅट, मिताली राज, मेग लॅनिंग, सोफी डिवाईन, एलिस पेरी, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, मेगॅन शूट, राजेश्‍वरी गायकवाड, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button