breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिला कायद्यांची जनजागृतीसाठी प्रशिक्षण शिबीर उपयुक्त – विजया रहाटकर

  • बचत गटांच्या शक्तीची देशाच्या विकासात पडतेय भर
  • आमदार लक्ष्मण जगताप यांनी बचत गटांचे केले कौतुक

पिंपरी, (महाईन्यूज) – महिला बचत गटांना महिलांविषयक कायदयांची जनजागृती करण्या करीता प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जात असून सक्षमीकरणासाठी हे शिबिर उपयुक्त असल्याचे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गंत महिला बचत गटांसाठीच्या प्रज्वल योजनेचे दुसरे प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आज नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळे गुरव येथे हा कार्यक्रम झाला. आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, स्थायी समिती सदस्या आरती चोंधे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुनिता तापकीर, नगरसेविका झामाबाई बारणे, सविता खुळे, चंदा लोखंडे, शारदा सोनवणे, नगरसेवक नामदेव ढाके, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.

रहाटकर म्हणाल्या की, महिला ही कुटूंबासाठी सतत झटत असते, घरासाठी त्याग करत असते. ती घराची आधारस्तंभ असते. सर्व महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येवून स्वताच्या पायावर उभे राहायला पाहिजे. बचत गटांनी कल्पकतेने आपले काम केले पाहिजे. प्रज्वल योजनेत महिलांविषयक कायदे व बचत गटाच्या योजनांची त्यांनी माहिती दिली. शहरातील बचत गटांना वेगवेगळया राज्यात प्रशिक्षण शिबिरे अथवा वस्तूंच्या प्रर्दशनासाठी जावयाचे असलेस अशा महिलांना महापालिकेने सहाय्य देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

आमदार जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवड ही श्रमिकांची नगरी आहे. काही कुटूंबांना प्रपंचाचा गाडा एका माणसाला हाकावा लागतो. त्यामुळे अशा कुटूंबाला अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अशा परीस्थितीत महिलांनी हातभार लावला पाहिजे. शहरातील बचत गट अनुदानापर्यंत जातात. परंतू, पुढे ते काम थांबवतात. दरवर्षी महापालिका सुमारे १०० कोटी रुपये खर्च करते. भविष्यात बचत गटांच्या शक्ती मुळे देश पुढे गेल्याशिवाय राहाणार नाही असेही ते म्हणाले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, बचत गटांनी डिजीटल साधनांचा अवलंब केला पाहिजे. खरेदी विक्री करताना स्वॅप मशिन किंवा ऍपचा वापर मोठया प्रमाणात केला पाहिजे. तसेच, बचत गटांचे आर्थिक व्यवहार व लेखे व्यवस्थित जतन करुन ठेवणे गरजेचे आहे. त्याचा फायदा व्यावसाय वाढीसाठी व बँकांकडून कर्ज उभारणीस मदत मिळू शकते, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमा खापरे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. तर, आभार सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी मानले.

गटातून कलागुणांना मिळतो वाव

महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे येथील शलाका साळवी यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. जनधन योजनेत बँक खाते उघडणे हे आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे. बेटी बचाव बेटी पढाव, कन्या समृध्दी योजना, मातृवंदन योजना, अटल पेन्शन योजना या योजनांची त्यांनी माहिती दिली. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे येथील वंदना कवठे यांनी बचत गटांचे फायदे विषद केले. आर्थिक, सामाजिक व राजकीय विकास झाला पाहिजे. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून कलागुणांना वाव मिळत असतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button