breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: भारतात प्रथम आढळलेल्या व वेगाने संक्रमण होणाऱ्या ‘डेल्टा’चा ब्रिटनमध्ये प्रसार

नवी दिल्ली |

भारतात प्रथम आढळलेल्या आणि वेगाने संक्रमण होणाऱ्या डेल्टा अथवा बी १.६१७.२ या कोविड-१९ विषाणू प्रकाराचा आता ब्रिटनमध्ये प्रसार वाढला आहे. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असे ब्रिटनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील आरोग्य विभागाचे अधिकारी देशातील कोविड-१९च्या सर्व प्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एका आठवड्यात डेल्टा प्रकाराची ५,४७२ जणांना लागण झाली असल्याने गुरुवारी बाधितांची एकूण संख्या १२ हजार ४३१ वर पोहोचली आहे.

त्यामुळे आता इंग्लंडच्या केण्ट प्रदेशामध्ये प्रथम आढळलेल्या ‘अल्फा’ला मागे टाकण्यापर्यंत डेल्टाचा प्रसार वाढला आहे, असा निष्कर्ष नव्या आकडेवारीनुसार तज्ज्ञांनी काढला आहे. करोनाच्या या प्रकाराचा ब्रिटनमध्ये प्रभाव वाढल्याने आपण शक्य तितकी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेच्या मुख्य कार्यकारी डॉ. जेनी हॅरिस यांनी म्हटले आहे. शक्य असल्यास घरातूनच काम , वारंवार हात धुणे, वायूविजन, याबरोबरच प्राधान्याने लस घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. हॅरिस यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button