breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

महिलांच्या ‘फर्स्ट क्लास’च्या डब्यात अल्पवयीन मुलाचे अश्लील चाळे

मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण मुंबई लोकलमधल्या फर्स्ट क्लासच्या डब्यात एक अल्पवयीन मुलगा हस्तमैथुन करत असल्याची बाब समोर आली आहे. एका तरुणीने या अल्पवयीन मुलाचा व्हिडिओ ट्विट करत त्या ट्विटमध्ये पोलिसांनाही टॅग केलं. ज्यावर मुंबई पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे. दोन दिवसांपूर्वी ठाणे स्टेशनजवळ हा प्रकार घडला. या तरुणीने ठाण्याहून सीएसएमटीला जाणारी संध्याकाळची ६.३२ ची लोकल पकडली. स्थानक सोडून दोन मिनिटे होताच डब्याच्या गेटजवळ एक अल्पवयीन मुलगा हस्तमैथुन करत असल्याचे तिला दिसले. ज्याचा व्हिडिओ या तरुणीने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

मुंबईत अशा घटना याआधीही झाल्या आहेत. त्यावेळी सीसीटीव्हीच्या आधारे असले प्रकार करणाऱ्या पकडण्यात आलं. मात्र त्यांना दम देऊन किंवा इशारा देऊन सोडण्यात आलं. मुंबईत रात्री ९ नंतर महिलांच्या डब्यात पोलीस असतात. मात्र आता संध्याकाळच्या सुमारासच असे प्रकार घडू लागल्याचे समोर आले आहे.

या मुलाचे अश्लील चाळे पाहून फर्स्ट क्लासच्या डब्यातील इतर महिलाही घाबरुन गेल्या. लोकलमधल्या काही महिलांनी या मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाहेर जायलाही तयार नव्हता. दोन ते तीनवेळा त्याला डब्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने डबा सोडला असंही ट्विट करणाऱ्या तरुणीने म्हटलं आहे. मुंबई पोलीस या अल्पवयीन मुलाचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button