breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, २२ हुन अधिक जणांचा झाला जागीच मृत्यू

Lewiston Mass Shooting : अमेरिका गोळीबाराच्या घटनेमुळे हादरला आहे. हा भयावर गोळीबार हा अमेरिकेच्या लेविस्टन शहरात घडल्याचे वृत्त आहे. हा गोळीबार इतका भयानक होता की, यामध्ये तब्बल २२ हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या भ्याड गोळीबारात ५० ते ६० जण जखमी झाल्याची माहिती तेथील वृत्तवाहिनीच्या आधारे समोर आली आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील नागरिक भयभीत झाले आहेत.

लेविस्टन शहरातील बॉलिंग अॅलेतील स्पेयरटाइम रिक्रिएशन आणि स्कीमेंजीस बार व ग्रिल या रेस्टॉरंटमध्ये हा गोळीबार झाला आहे. यासंदर्भात लेविस्टन शहरातील मेन स्टेट पोलीस आणि काउंटी शेरीफ यांनी एक अज्ञात शुटर असल्याची प्राथमिक माहिती समोर दिली होती. मात्र या माहितीनंतर अगदी काही तासांतच हा गोळीबार झाला आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या रुग्णांना ताबडतोब उपचार करण्यासाठी दवाखान्यात हलवण्यात आले होते.

हेही वाचा – मोशी-चऱ्होली ९० मीटर रस्त्याच्या कामाला ‘अल्टिमेटम’ 

या घटनेची दखल राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतली आहे. याबातची माहिती व्हाईट हाऊसमधून देण्यात आली आहे.याशिवाय पोलिसांना अज्ञात आरोपीच्या गाडीचा फोटो मिळाला असून पोलिसांनी तो सर्वत्र जारी केला आहे. या फोटोमध्ये असे दिसत आहे कि , ही गाडी पांढऱ्या रंगाची आहे. नागरिकांना ही गाडी आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाची बाब म्हणजे पोलिसांनी अज्ञात आरोपीचं नाव जाहीर केलं आहे. पोलिसांनी जारी केलेल्या व्यक्तीचं नाव रॉबर्ट कार्ड असे आहे. यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर अज्ञात आरोपीचा शोध घेतला जाईल असे सांगितले आहे. तसेच कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button