breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कानशिलात भडकावताच संताप अनावर झाल्याने दगडाने ठेचून मित्रानेच मित्राचा केला खून

पिंपरी | महाईन्यूज

दगडाने ठेचून मित्रानेच मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी येथे घडला. एकत्र जेवण करताना मित्राने शिवी दिल्यामुळे दुस-याने त्याच्या कानशिलात भडकावली. यातून संताप अनावर झाल्याने शिवी देणा-या मित्राने चापट मारणा-या मित्राचा पाठलाग करून दगडाने ठेचून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेअकराच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू गावात खटकाळी वस्ती येथे घडली.

प्रफुल्ल संपत गायकवाड (वय 27, रा. आसु, ता. फलटण, जि. सातारा) असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. दीपक दिगंबर भिमटे (वय 23, रा. सोळू, ता. खेड. मूळ रा. मोतीबाग, नागपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संतोष रामचंद्र निंबाळकर (वय 42, रा. माळवाडी, सोळू, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष निंबाळकर यांचा सोळू गावातील खटकाळी वस्ती येथे पाणी जारचा प्लांट आहे. मागील आठ महिन्यांपासून आरोपी दीपक त्याठिकाणी काम करत होता. प्लांटच्या शेजारीच त्याचा मित्र प्रफुल्ल याच्यासोबत तो भाड्याच्या खोलीत राहत होता. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता दीपक आणि प्रफुल्ल दोघे प्लांटमध्ये जेवण करून गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दीपकने प्रफुल्लला शिवी दिली.

याचा राग आल्यानंतर प्रफुल्लने दीपकच्या कानशिलात भडकावली. त्यावरून दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. प्रफुल्ल त्याठिकाणावरून पळू लागला. दीपक हा प्रफुल्लचा पाठलाग करत होता. दीपकने चीढून प्रफुल्लच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर प्रफुल्ल रस्त्यावर पडला. प्रफुल्लच्या डोक्यातून रक्त येत असताना दीपकने आणखी त्याला दगडाने मारले.

त्यानंतर दीपक संतोषच्या घरासमोर येऊन बसला. मध्यरात्री अडीच वाजता संतोष झोपेतून लघुशंकेसाठी उठले असता दीपक त्यांच्या घरासमोर बसल्याचे दिसले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने प्रफुल्लचा खून केल्याचे सांगितले. दीपकला घरापुढेच बसण्यास सांगून संतोष यांनी आळंदी पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दीपकला ताब्यात घेत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button