breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘केएसबी’ चौकातील ‘बीएसएनएल’ कार्यालयाजवळ कोरोना लसीकरण केंद्र सुरू करा – नगरसेविका अनुराधा गोरखे

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाचे लसीकरण शहरात चालू झालेले असताना याचे केंद्र चिंचवड, आकुर्डी तथा वल्लभनगर अशा ठिकाणी आहेत. यापूर्वी कोरोना टेस्ट करण्यासाठी केएसबी चौक येथील बीएसएनएल ऑफिस केंद्र सुरू होते. सध्या ते बंद आहे, त्याच ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र चालू करण्याची मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी आयुक्त राजेश पाटील आणि  महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे केली आहे

केसबी चौक येथील बीएसएनएल ऑफिस हे संभाजीनगर, शाहू नगर, घरकुल, चिखली, त्याचप्रमाणे इंद्रायणीनगर, भोसरी या परिसराच्या मध्यभागी आहे. या परिसरात लोकसंख्या ही भरपूर असल्याने ही जागा कोरोना लसीकरणासाठी सोयीस्कर ठरू शकते. हे ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे याठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button