breaking-newsक्रिडा

महिनाभरात निवडला जाणार आयसीसीचा नवा चेअरमन, ‘ही’ नावं चर्चेत

नवी दिल्ली : आयसीसीच्या नव्या चेअरमनच्या निवडणुकीसंबधी आयसीसी बोर्ड मीटिंग आज पार पडली. आजच्या बैठकीत विविध देशांचे क्रिकेट बोर्ड अधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. सर्वात आधी हे निश्चित केलं जाणार आहे की, नॉमिनेशन कसं फाईल केलं जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंगमध्ये मतदानाची गोपनियता कशी राहणार याबाबतही चर्चा आज झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार आज हे निश्चित झालं की पुढील एका महिन्याच्या आत नव्या चेअरमनचं नाव समोर येणार आहे. याचा अर्थ नॉमिनेशन फाईल, वोटिंग हे सर्व सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल आणि नवीन चेअरमनही निवडला जाईल.

इंग्लंडचे कॉलिन ग्रेव्स, वेस्ट इंडिचजे के डेव्ह कॅमरॉन, सिंगापूरचे इमरान ख्वाजा आणि न्यूझीलंडचे ग्रेगोर बर्कले पुढील आयसीसी चेअरमन पदाच्या रेसमध्ये आहेत. काही दिवस आधी आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीचंही नावही चर्चेत होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या पदासाठी सौरव गांगुली उत्सुक नाहीत.

सोमवारी म्हणजे आज पार पडलेल्या बैठकीत एकमात्र अजेंडा होता की निवडणुकीच्या नावनोंदणीची प्रक्रियेला अंतिम रुप देणे हा होता. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंन्सिलचे (आयसीसी) एकमताने निवड करण्याच्या निर्णयावर कोणतंही एकमत झालं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button