breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पिंपरी महाईन्यूज प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवाडी येथे स्वस्त दरात घरे उभारण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज स्वीकृती सुरू असून बँकांना सलग सुट्ट्या असल्याकारणाने 10 ऑक्टोबरपर्यंत या योजनेला मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. 

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) नागरिकांसाठी परवडण्यायोग्य अशा घरांची निर्मिती केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांकडून अर्ज भरले जात आहे. या योजनेसाठी अर्ज स्वीकृतीकरिता 2 ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु, यासाठी पाच हजार रुपयांचा डीडी आवश्यक असल्याने बँकांच्या सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे डीडी वेळेत मिळणे अवघड होतं आहे.

तसेच, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी, तक्रारी वाढल्याने नागरिकांच्या व विविध संघटनांच्या मागणीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीची मुदत 10 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असलेले नागरिक लॉटरी आधारित प्रणालीमार्फत बाजारपेठेतील किमतीपेक्षा कमी किमतीत 1 बीएचके सदनिका (फ्लॅट) या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे, असेही महापौर व सत्तारूढ पक्षनेते यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button