breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

आशिया कप रद्द, सौरव गांगुलीने दिली माहिती…!

मुंबई | कोरोना संकटामुळे क्रिकेटचे वेळापत्रक पुरते विस्कळीत झाले आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धेचे आयोजन होणार होते. मात्र कोरोना संकटाची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा रद्द झाल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. निर्णय कधी झाला हे गांगुली यांनी सांगितले नाही. पण गांगुली यांच्या घोषणेमुळे आशिया कप होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

ऑस्ट्रेलियात आतापर्यंत कोरोना १८ हजार ५१३ कोरोनाबाधीत आढळले आहेत. मात्र मेलबर्नमध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार असलेली टी २० वर्ल्ड कप स्पर्धा होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आयसीसीने स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय पुढे ढकलला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button