breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बिबट्या सफारी पार्क : बारामती विरुद्ध जुन्नर राजकारण तापले; माजी आमदार शरद सोनवणेंचा उपोषणाचा इशारा

पुणे : प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील शेतकरी- बिबट्या संघर्ष सफारीच्या माध्यमातून कमी करण्यासाठी तसेच पर्यटनवृद्धीसाठीसाठी ‘बिबट्या सफारी’ प्रस्तावित आहे. मात्र, त्याच्या बारामतीत होणाऱ्या स्थलांतराला शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी विरोध दर्शविला आहे. याच्या निषेधार्थ उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी सोमवारी (ता.१४) जाहीर केला. तर बिबट्या सफारीला मान्यताच नव्हती. त्यामुळे ती स्थलांतरित करण्याचा प्रश्‍नच नाही. शिवसेना कांगावा करत आहे, माणिकडोह येथील जलसंपदाच्या जागेत मिनी ‘झू’चा डीपीआर अंतिम आहे. तिथे ते होणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे.

बिबट्या आणि मानव संघर्ष ‘बिबट्या सफारी’द्वारे कमी करून पर्यटनवृद्धीसाठी बिबट्या सफारी पार्क आंबेगव्हाण येथे करण्यात येणार होता. मात्र अचानक ही सफारी बारामती तालुक्यात स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील राजकारण तापले आहे. सोनवणे यांच्या उपोषणाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

आता नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी गाडीखेल (ता. बारामती) येथील प्रस्तावित बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केल्याने संघर्ष वाढला आहे.

बिबट सफारी हा जुन्नर अस्मितेचा विषय आहे. यासाठी सर्वपक्षाच्या नेत्यांनी एकत्र लढल पाहिजे. या मध्ये आमदार अतुल बेनके यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी एकत्र आल पाहिजे.
– शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button