breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दोन भाईंचा बड्डे ; तलवारीने केक कापल्याने थेट कारागृहात रवानगी

पुणे – विश्रांतवाडी पोलिसांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापणा-या दोन भाईना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या भाईंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट म्हणून थेट कारागृहात रवानगी केली.

रोहित दीपक ठोंबरे (वय २१, मुंजाबावस्ती, धानोरी) व नीतेश बाबासाहेब सरोदे (वय १९, बर्मासेल लोहगाव) या दोघांना पेट्रोलिंग दरम्यान विश्रांतवाडी पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले. अधिक तपासात नीतेश याने रोहित याच्या वाढदिवसासाठी तलवार आणून याच तलवारीने केक कापून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकप्रमुख उपनिरीक्षक अभिजित चौगुले, पोलीस हवालदार प्रवीण राजपूत, कर्मचारी यशवंत किर्वे, विनायक रामाने, प्रवीण भालचिम, वामन सावंत, रिहान पठाण, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button