breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभागाने रावेत पंपिंग स्टेशनमधील तांत्रिक कामे, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील कामे, विद्युत विभागातील नियमित दुरूस्तीची कामे करणार आहे. याकरिता गुरूवारी (दि. २०) सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (दि.२१) पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

दरम्यान, गुरूवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. मात्र, सायंकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

पाणी वितरण व्यवस्थेतील कामांची दुरूस्ती करण्यासाठी गुरूवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू राहिल, मात्र सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुरूस्तीच्या कामामुळे शुक्रवारी पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी पुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button