breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपट ‘टॅक्स फ्री’…😊

उत्तर प्रदेश आणि हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला आहे. ‘तान्हाजी’ करमुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला. चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर तेराव्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.तानाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच ‘तान्हाजी’ पाहणार होते. मात्र त्यांनी मंत्रिमंडळासोबत हा सिनेमा पाहणार असल्याचं स्पष्ट केलं.,हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन दिलं होत.

मुंबईतील ‘प्लाझा’ चित्रपटगृहात मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या विशेष खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आधीच नाशिकमध्ये ‘तान्हाजी’ सिनेमा पाहिला.

‘तान्हाजी’ सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोंढाणा मोहीम फत्ते करताना वीरमरण आलेल्या तानाजी मालुसरेंचा गौरवशाली इतिहास ‘तान्हाजी’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button