breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

महाराष्ट्राच्या मातीतला संघर्ष ‘केसरी’ 15 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला

इरॉस नाऊने मोठ्या स्वप्नांसह लहान शहरातील तरुण होतकरू कुस्तीपटूची प्रेरणादायक कहाणी सादर करण्याची घोषणा केली आहे, कठोर परिश्रम करून यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड महेश मांजरेकर आणि विराट मकादे अभिनीत ‘केसरी’ या चित्रपटामधून १५ जानेवारी २०२1 पासून पाहायला मिळणार आहे.

वाचा :-१९ फेब्रुवारीला ‘प्रीतम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकण्यासाठी मेहनत करणाऱ्या एका युवकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. सुजय डहाके दिग्दर्शित या चित्रपटामध्ये विक्रम गोखले रूपा बोरगांवकर, मोहन जोशी, उमेश जगताप, नचिकेत पूर्णपात्रे आदींचा समावेश आहे.

देशातील सर्वात जुन्या ऐतिहासिक खेळाची कुस्तीची ही कहाणी, कुस्ती, केसरी यांचा उल्लेख आला की बलराम हे नाव डोळ्यासमोर येते. ज्यांनी हा सर्वोच्च ‘किताब एक दिवस मिरवला होता आणि आजोबांना समर्पित केला, जे प्रसिद्ध कुस्तीपटू असून त्यांच्यावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अंतिम सामना आणि त्यानंतर मॅच फिक्सिंगचा आरोप आहे.

याबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “केसरी” हे एखाद्याशी सहजपणे संबंधित होऊ शकणारा चित्रपट आहे. या कथेचा भाग होण्याची आणि बलरामच्या यशाच्या दिशेने मार्गदर्शनासाठी आणि हेतू सध्या करण्यासाठी मेहनत करणाऱ्या मुलाच्या शिक्षकाची भूमिका साकारण्याचा बहुमान मला मिळाला आहे. ओटीटीच्या भरभराटीमुळे, माझा ठाम विश्वास आहे की प्रादेशिक आशयाला प्रोत्साहन देण्यासाठी इरॉस नाऊचे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button