breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रध्वज उभारणीच्या कामाची होणार चौकशी – आयुक्त श्रावण हर्डिकर

पिंपरी ( महा ई न्यूज) –  निगडीतील भक्ती शक्ती उद्यानात उभारलेल्या 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या कामाची सखोल चाैकशी करुन संबंधित ठेकेदार व अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानात उभारलेल्या या राष्ट्रध्वजाचे महापालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०१८ रोजी या राष्ट्रध्वजाचे अनावरण करण्यात आले होते. परंतु, सर्वाधिक उंचीचा हा राष्ट्रध्वज अधिक आकारचा असून रात्रदिवस तो फडकत असतो. त्यामुळे या राष्ट्रध्वजाच्या कापडाचे धागे ओढले जाऊन शिलाई उसवतात. या सगळ्या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत पालिका आयुक्तांविरुध्द राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावरून राष्ट्रवादी, शिवसेनेने सत्ताधारी भाजपच्या व पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या सगळ्यावरून आयुक्त हर्डीकर यांना विचारले असता त्यांनी या संपुर्ण कामाची चौकशी सुरू केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राष्ट्रध्वजाबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या संपुर्ण कामाची माहिती घेण्यात आली आहे. काम करणारी ठेकेदारी संस्था व कामाचे नियोजन करणारे संबधित अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कामात काही त्रृटी राहिल्या आहेत का ? हे तपासले जात आहे. तसेच, महत्त्वकांशी प्रकल्प असताना सल्लागार नेमण्यात न आल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्याबाबत देखील सखोल चौकशी करून चूक्र आढळ्यास संबधित दोषींवर कारवाई केली जाईल.

राष्ट्रध्वजाचे धागे उसवत असल्याने तो न फडकविण्याचा पालिकेचा निर्णय योग्य आहे. त्यातून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. राष्ट्रध्वजाच्या कापडाबाबत मुंबईतील एका टेक्सटाईल कंपनीकडून संशोधन सुरू आहे. ते पूर्ण होताच कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न पालिकेचा आहे, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button