breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

संपूर्ण कुटुंबाचं आधार कार्ड एकाच मोबाईल क्रमांकावर; UIDAI ची नवी सुविधा

UIDAI ने नागरिकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. ज्या अंतर्गत संपूर्ण कुटुंबासाठी एटीएमसारखे आधार कार्ड बनविण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मोबाईल नंबर देण्याची आवश्यकता नाही. केवळ एका मोबाईल नंबरवरून आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड बनवू शकता.

या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त 50 रुपये खर्च करावे लागतील. या सुविधेसाठी UIDAIने केवळ 50 रुपये शुल्क आकारले आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्वीपेक्षा लहान आहे आणि अगदी एटीएम किंवा डेबिट कार्डसारखे आहे. जेणेकरून आपण ते सहजपणे आपल्या पाकिटात ठेवू शकता. आपण या सुविधेचा लाभ ऑनलाईन घेऊ शकता.

सर्व प्रथम आपल्याला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तेथे माझा आधार नावाच्या विभागात क्लिक करून आपल्याला नवीन आधार कार्ड ऑर्डर करावे लागेल. यानंतर आपण आपला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा. नंबर भरल्यानंतर, सुरक्षा कोड भरा, कॅप्चा योग्यरित्या भरा आणि सेंट ओटीपी वर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. हे ओटीपी जोडल्यास पीव्हीसीसह आपले आधार कार्ड प्राप्त होईल. त्यानंतर 50 रुपयांचे पेमेंट ऑनलाईन जमा करावे लागेल. पेमेंट प्रक्रिया पूर्ण होताच, आपला नवीन आधार 5 दिवसांत आपल्या घरी पोहोचेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button