breaking-newsताज्या घडामोडी

छत्रपती संभाजीराजेनी घेतली मनिषाराजे- यशराजेंची भेट

नाशिक – राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजेनी नाशिकमध्ये राहणाऱ्या मनिषाराजे आणि यशराजेंची आज सोमवारी सदिच्छा भेट घेतली. मनिषाराजे या भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजेंची बहिण तर यशराजे हे त्यांचे भाचे आहेत.

मनिषराजे आणि धनंजय पाटील यांनी संभाजीराजे हे घरी येताच त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस केली. उदयनराजेंचे भाचे यशराजे यांनी त्यांना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला होता. नाशिकच्या दोऱ्यावर आल्यानंतर संभाजीराजे यांनी यशराजे यांचा हट्ट पुरवला. ते त्यांच्या घरी आले. भरपूर गप्प मारल्या. त्यावेळी अनेक दिवसांपासून संपर्कात नसलेल्या संभाजीराजे आणि उदयनराजे यांची यशराजे यांनी फोनवरून संपर्क घडवून दिला. त्यानंतर एवढेच नव्हे तर संभाजीराजे यशराजेंच्या गाडी घेऊन फिरले. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत देखील यशराजे त्यांच्यासोबत होते. यशराजे हे नुकतेच लंडनवरून शिक्षण घेऊन आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button