breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या राजीनामा घेण्याचीही मागणी विरोधी पक्षातून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यात चर्चा झाली.

वाचा :-मृत्यूपर्यंत लढा देणार; मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे ट्विट

बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांची भूमिका मांडली होती. त्यांच्यावरील आरोपापेक्षाही त्यांनी केलेल्या कबुलीचा प्रत्येकाने धसका घेतला. त्यामुळे त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. अखेर मुंडे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. तसंच त्यांची भूमिका स्पष्ट केली.

रेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. तसंच पोलिस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना खुलासा करावा लागला. रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅकमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांच्या बहिण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसंच या संबंधातून आम्हाला दोन मुलेही आहेत, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं.

वाचा :-धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपावर भाजप आक्रमक, केली ‘ही’ मागणी

आज पवार यांना भेटून हेच स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलेलं असावं. कारण बुधावारी त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये माझ्या जवळच्या लोकांना आमचे संबंध माहिती आहेत तसंच कुटुंबाला देखील हे सगळं प्रकरण माहिती आहे, असं म्हटलं होतं. साहजिकच पक्षातील जवळच्या लोकांना धनंजय मुंडेंचं हे प्रकरण माहिती असावं, अशी अटकळ आता बांधली जात आहे.

धनंजय मुंडे यांनी पवारांची भेट घेतल्यावर पवारांनी त्यांना नेमका काय सल्ला दिला? किंवा धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणावर आता शरद पवार काय बोलणार? काय निर्णय घेणार, याची प्रतिक्षा आता राज्याला लागली आहे.

धनंजय मुंडे यांनी घेतली अजितदादा, भुजबळांची भेट
तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीला धनंजय मुंडेही उपस्थित होते. मुंडे यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button