breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसांच्या सुट्टीवर; सहकुटुंब जाणार महाबळेश्वर दौऱ्यावर

महाबळेश्वर | महाईन्यूज

गेल्या महिनाभरापासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्ष नाट्यामध्ये अनेक नेत्यांची झोप उडाली होती. सत्तेच्या सारीपाटात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष होतं. मात्र अखेर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने भाजपावर मात करत राज्याची सत्ता हातात घेतली. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती पदावर आली, शिवसेना पक्षप्रमुख जबाबदारी सांभाळत उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत.

मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची प्रशासकीय धावपळ सुरु असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. बैठका, उद्धाटन अशा कार्यक्रमातून वेळ काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसाच्या महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री महाबळेश्वर मुक्कामी असून राजभवन या शासकीय निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. वेण्णालेक पठारावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने प्रशासनानेही तयारी केलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचारी याठिकाणी दाखल झालेत. आमदार भास्कर जाधव यांच्या मुलीचा विवाह सभारंभ महाबळेश्वर येथील कीज रिसॉर्टमध्ये १ फेब्रुवारीला रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button