breaking-newsपुणे

माळीण दुर्घटनेला 5 वर्ष पूर्ण, माळीणकरांना वाहिली श्रद्धांजली

पुणे – पाच वर्षापूर्वीच्या त्या मन सुन्न करणाय्रा पहाटेची आजही आठवण काढली की अंगावरती शहारे उभे राहतात. पाच वर्षापुर्वी काही क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ते पुणे जिल्ह्यतील माळीण गाव, यामध्ये माळीण हे संपुर्ण गाव डोंगराखाली गाडले गेलं आणि यामध्ये तब्बल 151 मनुष्यांना आपला जिव गमावला लागला तर 900 पेक्षा जास्त मुक्या जणावरांनी ही यात आपला जिव गमावला. आज या दुर्दैवी घटनेला पाच वर्षे पूर्ण झाले असून, आज या माळीण गावात पाचवा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला. या आठवणी नातेवाईकांच्या डोळ्यात अजूनही ताज्या आहेत आज पाच वर्षानंतर माळीणकरांना श्रद्धांजली वाहिन्यात आली.

30 जुलै 2014 पाच वर्षापुर्वी याच माळीण गावावर ती पहाट काळाचा डोंगरच ठरली अन काहीच क्षणात होत्याचं नव्हतं झाल, त्याची आजही भीती या माळीण वासियांच्या मनात घर करुन बसली तिच भीती अजूनही दिवसरात्र या लोकांच्या मनात पाहायला मिळते, कारण या घटनेमध्ये घरातील कोणाची आई गेली तर कोणाचे वडील, भाऊ बहीण तर कोणाची मुले या घटनेमध्ये मृत्यू मुखी पडली यांची आठवण मात्र अजूनही येत असल्याचे चित्र पहायला मिळते.

ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली तो संपूर्ण परिसर निर्मनुष्य झालेला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले कौलारू घरांचे माळीण आता भकास झालेले दिसते. जिल्हा परिषदेची बंद पडलेली शाळा, अर्धवट पडलेल्या अवस्थेत असलेली घरे आणि सभोवताली गवत वाढलेला निर्मनुष्य परिसर एवढेच काय, ते माळीणचे अवशेष उरले आहेत, शासनाने या ठिकाणी स्मृतीस्तंभ तयार केला आहे. या वर जे या घटनेत मृत्यू मुखी पडलेत त्यांची नावे लिहिण्यात आली आहेत, तर यामध्ये मरण पावलेल्या माणसाच्या नावाने एक झाड लावण्यात आले आहे.

चार वर्षापासून आपल्या डोळ्यासमोर झालेली ही घटना आजही या लोकांच्या मनात घर करुन आहे. ती भीती तो प्रसंग आजही हे लोक अनुभवतात, त्या काळ्या पहाटेला आज पाच वर्ष होऊनही आज माळीणची ती भीती देशातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करुनच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button