पिंपरी / चिंचवड

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

  • मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार मेघडंबरीचे उद्घाटन

पिंपरी – महाराणा प्रतापसिंह यांच्या 478 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. निगडीतील महाराणा प्रतापसिंह उद्यानात मेघडंबरीचे शनिवारी (दि. 16) सकाळी उद्घाटन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आकुर्डीतील खंडोबामाळ चौकातून सकाळी 8 वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. निगडीतील महाराणा प्रतापसिंह उद्यानात यात्रेचा समारोप होईल. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि समस्त राजपूत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यटनविकास व स्वयंरोजगार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महापौर नितीन काळजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. निगडीतील महाराणा प्रतापसिंह उद्यानात महाराणा प्रतापसिंह यांच्या अर्धपुतळ्याला मेघडंबरी उभारण्यात आली आहे. मेघडंबरीचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. आकुर्डी येथून शोधा यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेतील पालखीत महाराणा प्रताप, राणी पद्यमिनी देवी, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरूषांच्या जन्मभूमी व कर्मभूमीची पवित्र मातीचे मंगल कलश असणार आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराणा प्रतापसिंह यांच्या 478 व्या जयंतीनिमित्त 478 झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी ( दि. 15) सकाळी सात वाजता भंडारा डोंगर येथून करण्यात येणार आहे. त्यासाठी राजपूत समाज संघटन, युवा राजपूत प्रतिष्ठान, महाराणा प्रतापसिंह विचारमंच संघटना, राजस्थानी राजपूत समाज आदी संघटनांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे. बिग इंडिया ग्रुपचे व्यवस्थापक नरेंद्रसिंह सेंगर यांनी सहकार्य केले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगर समस्त राजपूत समाज संघटनेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button