breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पहाटे कोंबडा आरवला, म्हणून झोप मोड झाल्याने महिलेची पोलिसात तक्रार

पुणे – पहाटे कोंबडा आरवला, त्यामुळे माझी झोप मोड झाली, म्हणून पुण्यातील एका महिलेने चक्क समर्थनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्या महिलेने निनावी अर्ज केल्याने पोलिस चक्रावले आहेत.

दोन दिवसांपूर्वी समर्थनगर पोलीस ठाण्यात एक निनावी तक्रार अर्ज आला आहे. या तक्रार अर्जात महिलेने म्हटले आहे की, घराजवळ पहाटे साडे चार वाजता कोंबडा आरवतो आणि त्यामुळे झोप मोड होते. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, असे महिलेने म्हटले आहे. महिलेचा हा तक्रार अर्ज वाचून पोलीसही चक्रावून गेले होते.

या तक्रार अर्जाबाबत समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले की, समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका महिलेकडून अशा स्वरूपाची तक्रार दोन दिवसापूर्वी करण्यात आली होती. त्यातक्रारीनुसार तपास सुरु आहे. एका महिलेने पहाटे कोंबडा आरवतो म्हणून पोलिसांकडे तक्रार केली आहे. या अनोख्या तक्रारीची सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button