breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर पदी राहूल जाधव तर उपमहापौर पदी सचिन चिंचवडे निश्चित!

  • राष्ट्रवादीकडून विनोद नढे यांचा महापौर, तर विनया तापकीर यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल
  • भाजपतर्फे महापौर पदासाठी राहूल जाधव, उपमहापौर पदासाठी सचिन चिंचवड यांचे अर्ज दाखल

 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदी राहूल जाधव तर उपमहापौर पदी सचिन चिंचवडे यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपतर्फे दोघांकडून नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज भरण्यात आले आहेत.

 

महापालिकेतील महापौर पद ओबीसीसाठी राखीव असल्याने पदासाठी माळी-कुणबी (मराठा) नगरसेवकांत रस्सीखेच सुरू होती. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या गटातील राहूल जाधव यांना महापौर पदावर संधी मिळावी, यासाठी माळी समाजाने पक्षावर दबाव आणला होता. तर, हे पद भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक शत्रुघ्न काटे यांना मिळावे यासाठी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. तसेच, नामदेव ढाके यांचा या पदावर दावा असून त्यांना काम करण्याची संधी देण्याकरिता खानदेशातील नागरिकांचे नेतृत्व करणा-या तसेच शहरातल्या अशा 25 सामाजिक संस्थांनी पक्षनेतृत्वाकडे मागणी केली होती.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि. 24) आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.  त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करायचे होते. भाजपतर्फे राहूल जाधव यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी सचिन चिंचवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांचीही नावे निश्चित झाली आहेत. केवळ निवडणूक घेण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे. अर्ज भरताना आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विधी समिती सभापती मोना कुलकर्णी, भाजप प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक उत्तम केंदळे, बाबू नायर, नगरसेविका सुजाता पालांडे, उषा मुंढे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीतर्फे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याचे फर्माण पक्षाचे कारभारी अजित पवार यांच्याकडून आले होते. त्यामुळे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापौर पदासाठी नगरसेवक विनोद नढे तर, उपमहापौर पदासाठी विनया तापकीर यांना उमेदवारी दिली. दोघांचे अर्ज नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते साने, शहराध्यक्ष वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर वैशाली घोडेकर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, जावेद शेख, नगरसेविका अनुराधा गोफणे आदी उपस्थित होते.

शनिवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता महापालिकेची विशेष महासभा होणार आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे  कामकाज पाहणार आहेत.

भाजप नेतृत्वाने आणि माजे राजकीय दैवत आमदार महेश लांडगे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी वैभवशाली काम करणार आहे. 

राहूल जाधव, भाजपचे उमेदवार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button