breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत उपभियंत्यांवर अतिरिक्त पदभार, दोघांच्या सेवाकार्यात बदल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेच्या विविध विभागातील पाच अधिका-यांना पूर्वीच्या पदाचा कार्यभार सांभाळून त्यांच्यावर अतिरिक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजाच्या आवश्यकतेनुसार आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी आज हा आदेश काढला आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यांची कामाची व्यापकता वाढली आहे. तर, काहींची कमी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील फ क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता दत्तात्रय रामगुडे यांच्याकडे जलशुध्दीकरण केंद्र (से 23) पाणी पुरवठा विभागातील सह कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील सुनिल वाघुंडे यांच्याकडे स्थापत्य (उद्यान) विभागातील सह कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. ह क्षेत्रीय स्थापत्य कार्यालयातील उपभियंता शिरीष पोरेडी यांच्याकडे सह कार्यकारी अभियंता (बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग (अ, ब, ड क्षेत्रीय कार्यालय)) पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

तर, प्रशासन (दक्षता व नियंत्रण) व स्थापत्य (उद्यान) कार्यकारी अभियंता मनोज सेठीया यांच्या प्रशासन विभागातील कामकाजात बदल करण्यात आला आहे. त्यांच्यावर प्रशासन विभागातील कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पाणी पुरवठा व जलनिःसारण मुख्य कार्यालयांतर्गत क व फ क्षेत्रीय पाणी पुरवठा, जलशुध्दीकरण केंद्र से 23 चे कार्यकारी अभियंता प्रविण लडकत हे यापुढे मुख्य कार्यालयातील पाणी पुरवठा व जलनिःसारण विभागाचेच कामकाज पाहणार आहेत. त्यांच्याकडील अ व फ क्षेत्रीय कार्यालयाची पाणी पुरवठ्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button