breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सहा टन गोमांस पिंपरी पोलिसांनी केले जप्त

पिंपरी – बेकायदेशीरपणे गाय – बैलाचे मांस कापून विक्रीसाठी नेत असलेल्या एका टेम्पोवर कारवाई करत तब्बल सहा हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बजरंग दलाच्या मदतीने पोलिसांनी पिंपरीत सोमवारी (दि. 9) रात्री नऊ वाजता केली. या कारवाईमध्ये एकूण 14 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 25, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री टेम्पोमधून (एम एच 04 / ई वाय 9968) गोमांस विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार स्वामी, त्यांचे मित्र कुणाल दिलीप साठे (वय 28), मंगेश नढे (वय 25), सचिन जवळकर (वय 26) यांनी पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ सापळा रचला. रात्री नऊच्या सुमारास हा टेम्पो चौकाजवळ आला असता, त्या टेम्पोला थांबवून आतमध्ये काय आहे, असे विचारले असता टेम्पोमध्ये गोमांस असल्याचे टेम्पो चालकाने सांगितले. टेम्पोच्या मागच्या बाजूला जाऊन बघितले असता गोमांस असल्याची खात्री झाली. दरम्यान, टेम्पोचालक कार्यकर्त्यांना चुकवून पळून गेला.

स्वामी यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी 9 लाख रुपयांचे 6 टन गोमांस आणि 5 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 14 लाखांचा ऐवज जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button