breaking-newsUncategorizedआंतरराष्टीयमुंबईराजकारणराष्ट्रिय

सायरस मिस्त्री अनंतात विलीन, हिंदू परंपरेनुसार झाले अंतिम संस्कार

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

टाटा सन्सचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांच्यावर वरळी येथील अत्याधुनिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदू परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. ते पारसी समाजातील होते. चार सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सूर्या नदीवरील पुलावर हा भीषण अपघात झाला. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून, यात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा त्या गाडीत 4 जण उपस्थित होते; त्यातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले. जहांगीर दिनशा पंडोल, सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला असून, अनायता पंडोले (महिला), दरियस पांडोले हे दोघे गंभीर जखमी आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर चारोटी टोलनाक्याजवळ गुजरातवरून मुंबईला येताना हा अपघात झाला, डिवायडरला आदळून अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

सायरस मिस्त्री हे देशातील एक ख्यातनाम व्यापारी आणि उद्योगपती होते, जे एका ट्रिलियनेअर कुटुंबातील होते. ते रिअल इस्टेट व्यावसायिक पालोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र होते. पालोनजी शापूरजी यांना एकूण चार मुले आहेत. सायरस मिस्त्री यांच्यापेक्षा एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. मोठ्या भावाचे नाव शापूर आणि बहिणींचे नाव लैला आणि अल्लू आहे. त्यांच्या एका बहिणीचा विवाह रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाला आहे. अशा प्रकारे ते रतन टाटा यांचे नातेवाईकही आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button